बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (08:05 IST)

पुण्यातील गंगाधाम चौकातील फर्निचरच्या गोडाऊनला लागलेली भीषण आग आटोक्यात

पुणे शहरातील गंगाधाम चौकातील आई माता मंदिराजवळील श्री जी लॉन्स येथे असलेल्या एका फर्निचरच्या गोडावुनला सोमवार रात्री  लागलेली भीषण आग 10.12 वाजता आटोक्यात आली. एकूण 15 गाड्यांनी आणि 40 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन तासभरात आग आटोक्यात आणली. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फर्निचरच्या गोडाऊनला आग लागली. काही मिनीटांमध्येच आगीनं रौद्र रूप धारण केलं. अग्नीशमन दलाचे  तब्बल 15 बंब वर्दी मिळाल्यानंतर काही मिनीटांमध्ये घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आणि 40 जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या  अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नसून सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.