बुधवार, 5 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शुक्रवार, 3 जानेवारी 2025 (10:58 IST)

पुण्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून 17 वर्षीय मुलाची हत्या, मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक

crime
Pune News: महाराष्ट्रात पुण्यात प्रेमसंबंधअसल्याच्या संशयावरून 17 वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितनुसार बुधवारी रात्री वाघोली परिसरात गणेश तांडे 17 या तरुणाला अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अल्पवयीन तरुण आरोपीच्या मुलीचा मित्र होता. त्यांच्यात रोज बोलणे होत असे. मुलीचे कुटुंबीय त्यांच्या मैत्रीच्या विरोधात होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला," अशी माहिती समोर आली आहे. तसेच अधिकाऱ्याने सांगितले की, मृत गणेश रात्री 12.30 च्या सुमारास त्याच्या मित्रांसोबत रस्त्याने चालला होता तेव्हा मुलीचे वडील आणि त्याची दोन मुले यांनी त्याला घेरले आणि लोखंडी रॉड आणि दगडांनी मारहाण केली. गणेश गंभीर जखमी झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला." अधिकाऱ्याने सांगितले की, तिघांनाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik