1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2024 (21:15 IST)

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Hoarding collapsed at Moshi
मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून होर्डिंग मालकाने होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असताना खबरदारी घेतली नाही. तसेच मजबुतीकरणाचे नूतनीकरण केले नसल्याने होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद रमणलाल गांधी स्ट्रक्चर डिझायनर हेमंत कुमार शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद पब्लिसिटी या कंपनीचा 40 फूट बाय 29 फूट आकाराचा होर्डिंग मोशी मधील तापकिरनगर येथे बसण्यात आला होता. त्या होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली होती. त्याच्या मुदतीत नूतनीकरण केले नव्हते. तशीच कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. 

गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले या मध्ये तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका दुकानाचे देखील नुकसान झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहे. 

Edited by - Priya Dixit