रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (23:47 IST)

पुण्यात दुकानदार महिलेला पोलीस कर्मचाऱ्या कडून बेदम मारहाण

पोलीस जनतेचे रक्षक म्हणून ओळखले जातात. मात्र पुण्यात पोलिसांच्या प्रतिमेला डाग लावणारी संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील एका दुकानासमोर पोलीस कॉन्स्टेबल नो पार्किंग झोन मध्ये वाहन पार्किंग करत असता दुकानाच्या महिलेने रोखले त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल चिडला आणि महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

महिले ने तिच्या दुकाना समोर वाहन पार्क करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला वाहन नो पार्किंग मध्ये लावू नका असं म्हटलं त्यावरून पोलीस कॉन्स्टेबलने चिडून सदर महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त केले जात आहे. या वर प्रतिक्रिया देत चित्रा वाघ म्हणाल्या 'दुकानासमोर नो पार्किंगमध्ये गाडी लावू नका असं सांगणाऱ्या दुकानदार महिलेला पोलीस कॉन्स्टेबलने इजा होई पर्यंत बेदम मारहाण केल्याची अतिशय संतापजनक आणि लज्जास्पद निषेधार्ह घटना घडली आहे. पोलीस रक्षक म्हणवले जातात त्यांनीच असं कृत्य करणं लज्जास्पद आहे. स्त्रीवर हात उगारण्याचा कोणाला अधिकार नाही. महिलेच्या अंगावर मारहाणीचे व्रण आहे. या घटनेची FIR दाखल करून पोलीस कॉन्स्टेबलवर उचित कारवाई करावी.  FIR ऐवजी का NC घेतलीत @CPPuneCity साहेब ??'.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी कॉन्स्टेबलच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. 
 
Edited By - Priya Dixit