सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (21:10 IST)

कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात मद्य विक्रीवर बंदी

drink
कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता राहावी यासाठी 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरात मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
 
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिक एकादशीच्या निमित्ताने शहरातील सर्व मद्य दुकानं 3 आणि 4 नोव्हेंबरला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

कार्तिक एकादशीच्या निमित्ताने  भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी काळजी घेतली जात आहे. तसेच गर्दीत कोणताही प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने याच पार्श्वभूमी  कार्तिक यात्रेदरम्यान मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor