1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (14:46 IST)

पुण्यात भरदिवसा काठीने मारून केली महिलेची हत्या!

murder
मोबाईलचोरीच्या संशयावरून भर रस्त्यात एका महिलेची हत्या करण्यात आली.दहा बारा दिवसांपूर्वी हरवलेल्या मोबाईलच्या संशयावरून दोन आरोपींनी महिलेला मारहाण केली त्यात महिलेचा मृत्यू झाला. वर्षा थोरात असे या महिलेचे नाव आहे. तर या हत्या प्रकरणात अब्दुल सैयद आणि गौरव चौगुले यांना अटक करण्यात आली आहे. सदर घटना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मयत वर्षा थोरात ही  फिरस्ता असून तिला दारूचे व्यसन होते. तर अब्दुल सय्यद हा अंडा भुर्जीचा व्यवसाय करतो. दहा बारा दिवसांपूर्वी अब्दुलचा मोबाईल चोरीला गेला होता. मोबाईल वर्षा थोरातने चोरल्याची माहिती त्याला कोणीतरी दिली. त्याने वर्षा हिला मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात येऊन त्याने वर्षाच्या डोक्यात काठीने वार केला. डोक्यात मार लागल्यामुळे ती खाली कोसळली. काठीने डोक्यात वार झाल्यामुळे तिचा डोक्यातून जास्त रक्तस्त्राव झाला. रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली.
 
 Edited by - Priya Dixit