मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (08:42 IST)

Accident in Pune: पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, 48 वाहनांचे नुकसान, 50 हून अधिक जखमी

accident
मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ तब्बल 48 वाहने ट्रकला धडकली. या अपघातात या वाहनांचे नुकसान झाले असून 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी उशिरा हा कंटेनर पुलाजवळील उतारावरून उतरताना नियंत्रण सुटून समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना धडकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि रस्त्यावरून जाणारे बचावकार्यात सहभागी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींवर दोन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
स्थानिक पोलीस आणि पुणे शहर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 8.30 च्या सुमारास नवले पूल परिसरात घडली. पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांनी सांगितले की, काही जखमींना जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.   
 
पुण्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर भीषण अपघात झाला असून त्यात सुमारे ४८ वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे अग्निशमन दल आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
 
नवले पुलावर हा अपघात झाल्याची माहिती सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघाताची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 
 
Edited By- Priya Dixit