1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Ajit Dada's NCP wins Pune Zilla Parishad with 43 seats

पुणे जिल्हा परिषदेवर अजित दादांच्या राष्ट्रवादीचा 43 जागांसह विजय

ajit pawar
यंदाचा पुणे जिल्हा परिषद 2026 च्या  निवडणुकाच्या निकालात अजित दादांचे स्वप्न जनतेने त्यांच्या पश्चात सत्यात उतरवले आहे. यंदाच्या पुणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हातील 75 जागांपैकी 43 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे.  
28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनांनंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका झाला. त्यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक होती.
या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या विकासाच्या धोरणांवर, त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादीला निवडून आणले आहे. अजित दादांच्या राष्ट्र्वादीने 75 जागांपैकी 43 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादीने 43 जागांचा आकडा पार केल्याने त्यांना कोणत्याही मित्रपक्षाच्या मदतीची गरज नाही. 
निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. एकच दादा अजित दादा, आणि अजित दादा अमर रहे अशा घोषणा मतमोजणी केंद्राच्या बाहेर कार्यकर्ता लावत होते. विजयाचा गुलाल उधळताना आपल्या लाडक्या अजित दादा पवारांची उणी त्यांना भासत असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या या विजयामुळे आगामी काळातील राजकारणात राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक अधोरेखित झाले आहे.
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ