मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 22 जुलै 2024 (12:49 IST)

विधानसभा निवडणूका महायुती सोबत, महापालिका स्वतंत्र लढण्याची अजित पवारांची घोषणा

ajit panwar
विधानसभा निवडणूकाला काहीच महिने शिल्लक आहे. विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी सर्व पक्ष एकत्रपणे लढवणार आहे. सध्या विविध पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जय्य्त तयारी सुरु असून महायुतीकडून पक्षांचे मेळावे घेतले जात आहे. 

महायुती कडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरकार बनण्याचा दावा करण्यात येत आहे. 
पुण्यात 21 जुलै रोजी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मेळाव्याला संबोधित करताना लोकसभा एकत्र लढलो आता विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 
 
ते पिंपरीत मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले, सध्या मीडियामध्ये काहीही अफवा पसरवल्या जात आहे. विकासकामासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
आंदोलन करून विकास होत नाही त्याने कोणतेही प्रश्न सुटणार नाही.विकासासाठी आपल्याला जिल्ह्यात जोमाने काम करावं लागणार आहे. 

मी पुण्याचा पालकमंत्री म्हणून 2004 पासून काम केलं. मावळात पैसे गेल्याचे सगळीकडे बोलले जात आहे. कारण नसताना नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामती शिरूरला निधी दिल्या बद्दल कोणीही काहीही बोलले नाही. असे ते म्हणाले.  
 
Edited by - Priya Dixit