1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Write it down the grand coalition government will come in the assembly elections Devendra Fadnavis

लिहून ठेवा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार - देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीचे सरकार येणार हे लिहून ठेवा. असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बालेवाडीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनात केले. त्यांनी माविआच्या नेत्यांवर टीका केली. 
 
गुरुपौर्णिमा निमित्त बोलताना ते म्हणाले, हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा ध्वज आपला गुरु आहे. आपण त्याचे मान राखावे. असे आवाहन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडी जिंकणार असा मला विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सक्रिय राहावे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या प्रचारावर कठोर भूमिका घ्या. विरोधक वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण करत आहे. राजकीय फायदा मिळवायची विरोधक फूट वाढवत आहे.  हा खोटा प्रचार सध्याच्या काळातील नव्या रावणा प्रमाणे आहे. त्याच्या नाभीला भेदले पाहिजे. त्यांचे हे प्रयत्न आपण हाणून पडले पाहिजे.
 
विरोधक हिंदूंना हिंसक म्हणतात. आम्ही हिंदू आहो असे अभिमानाने सांगा. भारतीय जनता पक्षातील  प्रत्येकाला मैदानात उतरून चांगले प्रदर्शन करायचे आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आदेशाची वाट न पाहता विरोधकांना  ठोकून काढावे असे आदेश दिले.फडणवीसांच्या या आदेशावर कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला.हे अधिवेशन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit  
 
पुढील लेख
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ यांना अतिवृष्टीच्या पार्शवभूमीवर सूचना दिल्या