रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (16:56 IST)

पुण्यात प्रेयसीचा खून करून मृतदेह ऑटोमध्ये टाकून आईच्या घरासमोर टाकला

murder
पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह आईच्या घरासमोर टाकून पळ काढल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 12 ते 3 दरम्यान ही घटना घडली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तरुण हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गेल्या 2 वर्षांपासून राहत होते. मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ गोष्टींवरून वाद झाला. यावर तरुण प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून खून ला आणि तिचे मृतदेह ऑटोमध्ये टाकून समर्थ जगताप नगर परिसरात प्रेयसीच्या आईच्या घरासमोर रिक्षा उभी करून पळून गेला. आरोपी हा रिक्षा चालवायचे काम करतो. 

बुधवारी सकाळी दिवस उजाडतातच स्थानिकांना तरुणीचा मृतदेह ऑटो रिक्षात आढळला. त्यांनी वाकड पोलिसांना ही माहिती दिली. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. वाकड पोलीस आरोपी प्रियकराचा शोध लावत आहे.  
Edited by - Priya Dixit