शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (18:51 IST)

समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडण्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली असून समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्ग पुणे जिल्ह्याला जोडला जाणार आहे. 
राज्य सरकारने 53 किमीच्या सहा पदरी पुणे- शिरूर उन्नत महामार्गाला मंजूरी दिली आहे. हा मार्ग छत्रपती संभाजीनगर मार्गे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर असणार. पुणे-शिरूर- अहमदनगर  राज्य महामार्गाला समांतर हा सहा पदरी उड्डाण मार्ग तयार केला जाणार असून  अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. त्यासाठी आणखी 2 हजार 50 कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 9 हजार 565 रुपये इतका येणार आहे.पुण्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. 
Edited by - Priya Dixit