सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (21:01 IST)

पुण्यात ४० लाखाची ब्राऊन शुगर जप्त, गुन्हा दाखल

crime news
पुण्यात ४० लाख रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-दोन यांनी कोंढवा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करत एका इसमाच्या ताब्यातून ४० लाख ते ३३ हजार रुपये किमतीचे ब्राऊन शुगर जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शाहीर शेख हा ब्राऊन शुगर हा अमली पदार्थ त्याच्या ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार अमली विरोधी पथकाने सदर ठिकाणी जाऊन खातरजमा करत, शाहिद शेख यास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ३३६.१ ग्रॅम वजनाचे ४० लाख ३३ हजार २०० रुपये किमतीची ब्राऊन शुगर आणि दहा हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख १६०० रुपये असा ४० लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी शाहीर शेख याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.