बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:49 IST)

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, वाचणार 40 रुपये

हि बातमी बातमी केंद्रीय अर्थसंकल्पाशी निगडीत नाही मात्र  तरी पुणेकरांच्या फायद्याची आहे. थोडी फार नाही तर प्रत्येकी 40 रुपयांची बचत करणारी आहे.
 
राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. रुग्णसंख्याही घटत असल्याने निर्बंधांमध्ये शिथलता देण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री सामान्यदराने पुन्हा सुरू झाली. 1 फेब्रुवारीपासून (आजपासून) प्लॅटफॉर्म तिकीट प्रति व्यक्ती 10 रुपये या दराने उपलब्ध होईल. कोविड  साथरोगाच्या काळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी यापूर्वी तिकिटाचा दर 50 रुपये करण्यात आला होता.