शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (12:30 IST)

जनता वसाहतीत कॅनॉलमध्ये रिक्षा पडली, चालक वाहून गेल्याची भीती

The rickshaw fell into the canal in Janata Colony
पुण्यातील जनता वसाहतीत कॅनॉल मध्ये रविवारी रात्री आठच्या सुमारास रिक्षा कोसळून पडली. अपघाताची माहिती मिळतातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या मदतीने रिक्षा बाहेर काढली. परंतु रिक्षा चालक वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, जनता वसाहतीत कॅनॉल लगत असलेल्या एका गल्लीत प्रवाशाला सोडण्यासाठी एक रिक्षा आली असता रिक्षा वळवताना रिक्षा चालकाचं नियंत्रण रिक्षावरून सुटल्याने रिक्षा कॅनॉल मध्ये पडली. स्थानिकांनी आरडाओरडा केला आणि अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. 
 
अग्निशमन दलांच्या जवानांनी रिक्षात किती जण असल्याची माहिती मिळवली. त्यात प्रवाशी नसून एकटा रिक्षा चालकच असल्याची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवानांनी दोरी टाकून रिक्षा बाहेर काढली. रिक्षा चालक त्यात आढळला नाही. रिक्षा चालक वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंधारामुळे रिक्षाचालकांना शोध कार्य थांबवावे लागले होते. आता पुन्हा रिक्षा चालकाचा शोध घेण्याचे कार्य सुरु होणार आहे.