1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (09:57 IST)

अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजी नगर मधून अटक

arrest
पुण्यात पोर्श कार ने दोघांना उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर येथून अटक केली आहे. 

अल्पवयीन आरोपीवर आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल हे फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध लावत त्यांना छत्रपती संभाजी नगर येथून त्यांना अटक केली आहे. 
त्यांना आज दुपार पर्यंत पुण्यात आणले जाणार आहे. नंतर अटकेची कारवाई करून त्यांना कोर्टात हजर केले जाईल. 

बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवत दुचाकीला धडक देत दोघांना उडवलं . या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ठा जागीच ठार झाले. परवाना नसून देखील त्याच्या हातात कार दिलीच कशी हा प्रश्न उध्दभवत आहे.या प्रकरणी मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला .गुन्हा दाखल झाल्यापासून मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल हे फरार झाले होते. पोलिसानी तातडीनं तपासाची चक्रे फिरवत त्यांना छत्रपती संभाजी नगर येथून अटक केली.

विशाल अग्रवाल रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉज मध्ये लपलेले असून त्यांना तिथून अटक केली तर त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर दोघांना छत्रपती संभाजी नगर गुन्हे शाखेने अटक केली. नंतर त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाता नंतर अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याची 15 तासानंतर जामिनावर सुटका झाली. 
 
Edited by - Priya Dixit