1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 (09:43 IST)

पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या

rape
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुन्ना पोळेकरच्या नावाने अकाऊंट बनवत स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत हा प्रकार केलाय.
 
मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्या नावानेच या धमक्या देण्यात येत आहेत. पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरु आहे. काही दिवसापूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची गोळ्या झाडत करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरुच आहेत. शरद मोहोळची पत्नी काही दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आली होती. माझ्या पतीच्या जाण्याने मी खचणार नाही, असेही तिने स्पष्ट केले होते.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor