गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 8 सप्टेंबर 2025 (14:36 IST)

मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द बोलण्या प्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ता संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल

Maratha community
हिंदुत्ववादी कार्यकर्ता संगीता वानखेडे यांनी  मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द वापरण्याबद्दल मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या  महिलांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पुण्यातील भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. आणि संगीता यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे 
संगीता वानखेडे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी फिर्याद दिली आहे. 
संगीता यांनी मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत अपशब्द काढले तसेच मराठा समाजाच्या महिलांबद्दल अपशब्द काढत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
त्यांची पोस्ट व्हायरल झाल्यावर मराठा समाजाच्या महिलांनी यावर आक्षेप घेतला आणि महिलांनी संगीता वानखेडेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत चिखलीतील महिलांनी रविवारी दुपारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.
तसेच जो पर्यंत संगीता वानखेडेवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी मागणी आंदोलन करणाऱ्या महिलांनी केली. पोलिसांनी या प्रकरणी संगीता वानखेडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit