सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By

कोरोना व्हायरस, राज्यातील संशयित रुग्णांची संख्या नऊ

कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे. चीनहून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संशयित रुग्णांची संख्या नऊ झाली आहे.
 
आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, मुंबई, पुण्यात एकूण सहा जणांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या 6 जणांपैकी 4 जण मुंबई आणि 2 जण पुण्यातील रुग्णालयात आहेत. नांदेडमध्ये दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत.  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत चीनहून भारतात येणार्‍या 3,756 प्रवाशांची तपासणी करण्यात आली.