1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified बुधवार, 28 एप्रिल 2021 (10:53 IST)

कोरोनाबाधित आरोपी दीप्ती काळेची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुण्यातल्या ससून रुग्णालयातील कोविड इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून ‘मोक्का’च्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दीप्ती काळे या महिलेने आत्महत्या केली. दीप्ती काळे हिच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे पुणे पोलीस आणि तिच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
 
आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी तिला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर तिचा रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला ससून रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. दरम्यान तिने रुग्णालयातील बाथरूम मधून खाली उडी मारली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.