Daily Horoscope
✕

सोसायटी/अपार्टमेंटमधील पार्किंगवरुन भांडण होताय? आधी हे वाचा

Updated: बुधवार, 4 मे 2022 (08:07 IST)
 
पार्किंग कुणाला द्यायचे हे सोसायटी ठरवू शकते बिल्डर नाही.एखाद्या व्यक्तीने बिल्डरला लाखो रुपये दिले असतील, करारनाम्यात तसा उल्लेख असेल, बिल्डर ने allotment letter दिले असेल तरीही सोसायटी सदर पार्किंग परत घेऊन ते इतर सभासदाला देऊ शकते असा महत्त्व पूर्ण निकाल ठाणे येथील अतिरिक्त ग्राहक आयोगाने नुकताच दिला आहे.तेव्हा नवीन ग्राहक जे फ्लॅट खरेदी करतात त्यांनी पार्किंग अजिबात विकत घेऊ नये.आपण लाखो रुपये पार्किंग साठी दिले तरीही सोसायटी आपले पार्किंग काढून इतर व्यक्ती ला देऊ शकते. जिथे पार्किंग साठी जागा कमी आहे तिथे सोसायटी रोटेशन पद्धतीने पार्किंग सभासदांना देऊ शकते.
 
ज्या सभासदांनी, फ्लॅट ग्राहकांनी या आधी बिल्डरला लाखो रुपये देऊन पार्किंग विकत घेतले आहे त्यांनी बिल्डर ला नोटीस देऊन सदर आपले पैसे व्याजासहित परत मागून घ्यावेत. आपण नोटीस देऊन ही बिल्डर पैसे परत करत नसतील तर त्यांचे विरुद्ध केस दाखल करू शकता.तसेच आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात घेऊन आपण त्या बिल्डर वर फसवणुकीचा गुन्हा इंडियन पिनल कोड नुसार दाखल करावा. मोफा कायद्या नुसार पण आपण सदर बिल्डर वर गुन्हा दाखल करू शकता.पोलीस गुन्हा दाखल करण्यास नकार देत असतील तर आपण सदर पोलीस स्टेशन मधील ठाणे अम्मलदार यांचे विरुद्ध आय पी सी कलम 166 नुसार तक्रार सहायक पोलीस आयुक्त यांचे कडे किंवा कमिशनर ऑफ पोलीस यांचे कडे करू शकता. शिवाय आपण ऑनलाइन FIR दाखल करू शकता. सरते शेवटी आपण न्यायालयात जाऊन सदर गुन्हा नोंदवणे साठी पोलिसां1ना आदेश घेऊ शकता. यासाठी कोणत्याही वकिलाची गरज लागत नाही.
 
याबाबत आपणास मोफत मार्गदर्शन हवे असल्यास आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत शी संपर्क करू शकता.विजय सागर (मो. 9422502315)संघटक पुणे महानगर आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,  अखिल भारतीय ग्राहक पंचायत,६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.मोफत मार्गदर्शन:सोम, बुध, शुक्र सायंकाळी 6 से 7.30www.abgpindia.com
 
श्री विलास लेले9823132172सौ अंजली देशमुख9823135803श्रीमती विजया वाघ9075132920श्री रवींद्र वाटवे9422383785श्रीमती राजश्री दीक्षित9422318909श्री रवींद्र सिन्हा, बाणेर7774001188श्री विश्वास चव्हाण,धानोरी7769978484श्री अरुण नायर,विश्रांतवाडी9890652675श्रीमती किशोरी रावळ, हडपसर 83909 02773

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

गायीला वाचवताना अपघातात प्रसिद्ध कवयित्री जागीच ठार

मुंब्रामध्ये मिठाई खाल्ल्यानंतर पाच जण आजारी पडले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू ; FDA ने मिठाईचे दुकान बंद केले

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला गती मिळणार! कसारा आणि मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

पुढील लेख
Show comments