शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (15:57 IST)

घटस्फोटित पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या वडगाव शेरी येथील घटना

आपण दिलेले पैसे परत मागणार्‍या घटस्फोटित पत्नीवर चाकून वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार वडगाव शेरीला घडला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सनी बाळु गायकवाड (वय ३२,रा.केशवनगर, मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व सनी गायकवाड यांचा घटस्फोट झाला आहे. फिर्यादी याने सनी गायकवाड याला वेळोवेळी पैसे दिले होते. ते पैसे फिर्यादी मागत होत्या. सनी याने पैसे देण्यास नकार दिला तरी त्या वारंवार पैशांची मागणी करीत होत्या.सनी याने फिर्यादी यांना फोन केला.
 
त्यांना सोसायटीच्या खाली बोलावले. त्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये आल्या असताना सनी याने त्यांच्या डाव्या हातावर, दंडावर, छातीवर चाकूने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.त्या जखमी झाल्याचे पाहून तो पळून गेला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून चंदननगर पोलीस त्याचा शोध घेत आहे.