शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (14:06 IST)

पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे येथील दत्तवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 
 
श्रीकांत सरोदे (वय ३६), आदित्य ऊर्फ सन्या पवार (वय १९), सुर्वेश जाधव (वय ३६) आणि आशिष मोहिते (वय १८, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
नराधम आरोपींनी पीडितेला घरी घेऊन जात असल्याचं खोटं सांगत पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 
25 वर्षीय पीडित मुलगी काल सायंकाळी स्वारगेटवरून कात्रजला आपल्या घरी चालली होती. यावेळी आरोपीनं तुला घरी सोडतो असं खोटं सांगून पीडितेला जनता वसाहतीत नेण्यात आलं. याठिकाणी चार जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. 
 
हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्‍यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 वर्षीय पीडित तरुणी मतिमंद आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारास ती स्वारगेटवरून आपल्या घरी कात्रजला जात होती. दरम्यान आरोपींची तिच्यावर नजर पडली. पीडित तरुणी मतिमंद असल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपीनं तिला घरी सोडतो असं खोटं सांगितलं. आरोपींना तिला कात्रजला घेऊन जाण्याऐवजी आपल्या घरी जनता वसाहत परिसरात नेलं. 
 
या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.