गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (08:36 IST)

हिंजवडी आयटी पार्क येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Exposed prostitution under the name of Spa Center at Hinjewadi IT Park Maharashtra News une News In Marathi Webdunia Marathi
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला.पीडित महिलेची सुटका करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी व्हाईट स्केवर बिल्डिंग येथील बिल्स स्पा सुमारास ही कारवाई केली.करण राजेंद्र हजारे (वय 23,रा हिंगणे खुर्द,सिंहगड रोड,पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बिल्स स्पा सेंटर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकून कारवाई केली.आरोपी पीडित महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होता.त्यातून मिळालेल्या पैशांमधून आरोपी आपली उपजीविका भागवत होता.पोलिसांनी महिलेची सुटका करून आरोपीला अटक केली.हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.