शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (12:06 IST)

पीएमपीएमएल’मध्ये अप्रेंटीसची संधी, 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार

पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) एक वर्षासाठी अप्रेंटीसची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.अप्रेंटीससाठी विविध ट्रेडच्या 395 विद्यार्थ्यांकडून शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज मागविण्यात आले आहेत.
 
ही नोकरभरती नसून प्रशिक्षणार्थीचा (अप्रेंटीस) प्रशिक्षण / ट्रेनिंग / फिल्ड ट्रेनिंग कालावधी फक्त एक वर्षाकरिता आहे. एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीसाठी इच्छुक उमेदवारांनी अप्रेंटीस पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह आवक – जावक विभाग, पीएमपीएमएल कार्यालय, स्वारगेट, पुणे येथे 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात आले आहे.