बुधवार, 30 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (08:35 IST)

दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या प्रेयसीचा खून,हात,पाय,धड वेगवेगळे करून लवासात नेऊन फेकले

दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या प्रेयसीला खून करून तिच्या शरीराचे वेगवेगळे तुकडे करून बॅगेत भरल्यानंतर या बॅगा लवासातील निर्जन परिसरात फेकून दिल्या.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
 
कविता चौधरी ऊर्फ रोजिना रियाज पानसरे (वय 30) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत शिंदे (वय 40, रा. फरासखाना) याला अटक केली आहे.फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मयत कविता चौधरी आणि आरोपी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते.कविताही बुधवार पेठ वेश्या व्यवसाय करायची तर आरोपीचे लग्न झाले होते.तरीही त्याने कविताला बुधवार पेठेत भाड्याने खोली घेऊन दिली होती आणि त्या ठिकाणी तो येऊन जाऊन करत असे.
 
दरम्यान 12 ऑगस्टपासून कविता बेपत्ता झाली होती.फरासखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती.तपासा दरम्यान पोलिसांना हनुमंत शिंदे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची माहिती मिळाली होती.त्यानंतर पोलिसांनी हनुमान शिंदे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.
 
कविताला दारू पिण्याचे व्यसन होते.तर हनुमंत हा निर्व्यसनी होता दारू पिल्यानंतर ती त्याला अश्लील शिवीगाळ करत असेल.तसेच पहिल्या पत्नीकडे जाऊ नको असे म्हणून त्याच्याशी वाद घालत असे.याच वादातून हनुमंत ने 12 ऑगस्ट रोजी गळा आवळून तिचा खून केला.त्यानंतर दोन दिवस मृतदेह घरात तसाच ठेवला.14 ऑगस्ट रोजी मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या बँकेत भरले आणि त्या बॅगा लवासा परिसरातील निर्जन परिसरात नेऊन फेकून दिल्या.