1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified बुधवार, 14 एप्रिल 2021 (11:58 IST)

स्लीव्हलेस टॉप घालायला लाज वाटणार नाही, अंडरआर्म्ससाठी खास उपाय

काय आपले अंडरआर्म्स आपल्याल स्लीव्हलेस कपडे घालण्याची परवानगी देत नाही तर काही प्रभावी उपाय आहते-
 
शरीराच्या काही अवयवांचा इतर भागांपेक्षा वेगळा असतो अशात काही विशेष उपाय करुन समस्या सोडवता येऊ शकते.
 
अंडरआर्म्स गडद होण्यामागील कारण
जास्त प्रमाणात घाम येणं
घाण
घर्षण
हायपरपीगमेंटेशन
जिवाणू संसर्ग
मेलास्मा किंवा त्वचेवर गडद डाग
अ‍ॅडिसन रोग
हार्मोनल बदलमुळे तर केमिकल प्रॉडक्टच्या प्रभावामुळे 
 
ही समस्या महिलांसाठी सामान्य असली तरी घरगुती उपयांनी काळपटपणा दूर करता येऊ शकतो.
 
काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
1. बटाटा
यात स्टार्चचं प्रमाण अधिक असतं ज्यामुळे हे ब्लीच प्रमाणे काम करतं. अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी बटाटा ‍किसून याचं रस काढून काखेला लावा. नंतर 10 मिनिटाने गार पाण्याने धुऊन घ्या.
 
2. काकडी
काकडीत हायड्रेटिंग गुण असतात ज्यामुळे कोरड्या त्वचेत चमक येते. काकडीचे मोठे तुकडे करुन प्रभावित भागावर घासा. नंतर 10 मिनिटाने धुऊन घ्या.
 
3. लिंबू
लिंबात व्हिटॅमिन सी आढळतं ज्याने मळ दूर होतो व त्वचेत नैसर्गिक गोरेपणा दिसून येतो. लिंबाची फोड कापून अंडरआर्म्सवर घासा. 10 मिनिटाने गार पाण्याने धुऊन घ्या. वाळल्यावर मॉइस्चरायजर लावा.
 
4. संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीचं पेस्ट तयार करण्यासाठी 1 चमचा दूध व 1 मोठा चमचा गुलाबपाणीसह साली मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता ही पेस्ट लावा. 15 मिनिटाने धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करता येईल.
 
5. हळद
हळद अॅटी-ऑक्सीडेंट्स समृद्ध असल्यामुळे घामामुळे उद्धवलेल्या इंफेश्नला दूर करण्यास मदत करते. एका वाटीत अर्धा लहान चमचा हळद, 2 चमचे लिंबाचा रस मिसळून अंडरआर्म्सवर लावा. अर्ध्या तासाने धुऊन घ्या.
 
6. टी ट्री ऑयल
टी ट्री ऑयलचे 5 थेंब एका स्प्रे बॉटलमध्ये पाण्यासह मिसळा. अंडरआर्म्सवर स्प्रे करा व नैसर्गिक रीत्या वाळू द्या. दररोज अंघोळ केल्यावर स्प्रे लावा. हळू-हळू फरक जाणवेल.
 
इतर टिपा
अनेकदा परफ्यूम- डिओडोरेंट अंडरआर्म्ससाठी चांगले नसतात. म्हणून नैसर्गिक प्रॉडक्ट्स वापरा.
शेविंग करु नका याने अंडरआर्म्स काळे पडतात. वॅक्सिग योग्य पर्याय आहे. 
अंडरआर्म्स नियमित एक्सफोलिएट करत राहा.