सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 12 एप्रिल 2021 (07:06 IST)

असा हवा उन्हाळ्यातला मेक-अप

उन्हाळ्यात सुंदर दिसणे एक सोपी गोष्ट नव्हे कारण या दिवसांमध्ये कोणाला मेक-अप वितळण्याची भीती असते तर कोणाला घामाने पुसल्या जाण्याची. अश्यावेळी काळजी आणखी वाढते जेव्हा तुम्हाला पार्टीला जायचं असतं किंवा साधारण बाहेर पडायचं असलं तरी मेक-अप कसा टिकवायचा हा प्रश्न असतोच. मेक-अप तज्ज्ञांप्रमाणे या सीझनमध्ये ब्राइटऐवजी लाइट मेक-अप वापरावा. मेक-अप जितका कमी असेल तुम्ही तेवढेच सुंदर दिसाल.
 
* उन्हाळ्यात त्वेचेला सनबर्नपासून बचाव करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. यासाठी सनस्क्रीन लोशन खूपच गरजेचं आहे पण त्याहून गरजेचं म्हणजे की सनस्क्रीन बाहेर पडण्याच्या 20 मिनटांपूर्वी चेहर्‍यावर आणि हात-पायांना लावायला पाहिजे.
 
* या ऋतूत फाउंडेशनचा वापर न केलेलाच योग्य तरी वाटल्यास मिनरल फाउंडेशन किंवा प्रायमर वापरू शकता.
 
* उन्हाळ्यात वाटरप्रूफ आय लाइनर आणि मस्करा वापरला पाहिजे.
 
* या कडक उन्हाळ्यात लिपग्लॉसचा वापर न करता लिप स्टेन वापरा. जर लिपस्टिकचा वापर करायचा असेल तर आधी फाउंडेशनचा बेसवर लिपस्टिक लावा.
 
* या सीझनमध्ये केसांकडे लक्ष्य देणे ही तेवढेच गरजेचं आहे. घामामुळे केस चिकट वाटू लागतात. म्हणूच ब्युटी तज्ज्ञांचे मत आहे की शक्योतर केसांना बांधून ठेवावे.
 
हे समर सीझन टिप्स अमलात आणून तुम्ही हॉट सीझनमध्येदेखील कूल दिसू शकता.