शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (08:46 IST)

पुण्यात आईनेच पोटच्या बाळाला फेकले ओढ्यात, मात्र बाळ ‘सुखरुप’

अनैतिक संबंधातून झालेल्या बाळामुळे होणारी बदनामी टाळण्यासठी जन्मदात्या आईने एका दिवसाच्या बाळाला ओढ्यात फेकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.ही घटना पुण्यातील आंबील ओढ्यात उघडकीस आली असून बाळाला टाकणाऱ्या महिलेवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहारसहकऱ्यांसोबत हद्दीत गस्त घालत होते.गस्त घालत असताना दांडेकर पूल आंबिल ओढा या नागरिकांची गर्दी झाल्याची माहिती मिळाली.आंबिल ओढ्याच्या कडेला असलेल्या चिखलात एक नवजात जिवंत बालक (मुलगा) सापडल्याने परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बाळाला ताब्यात घेऊन तातडीने उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले.
 
दरम्यान पोलिसांनी यासंदर्भात पोलिसांनी परिसरात तपास केला.तपासादरम्यान नागरिकांकडून माहिती मिळाली कीअनैतिक संबंधातून एका महिलेने या बाळाला बदनामी टाळण्यासाठी बलकाला फेकून दिले आहे.याप्रकरणी आरती निखील बोडके (वय-29 रा. दांडेकर पुल, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.