पेशवाई भोजन कसे असायचं .... वाचून थक्क व्हाल

food
Last Modified मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (14:23 IST)
आपण कोठे ही चांगले जेवण मिळाले की त्याचे वर्णन "पेशवाई थाट" असा सहज करतो. पण प्रत्यक्षात "पेशवाई थाट" एवढा सोपा नव्हता!


कसा होता "पेशवाई थाट"?
पेशवाईतील भोजन व्यवस्थेचा थाटमाट ...
पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. लाकडावर शिजवलेले अन्न पेशवे कधीही ग्रहण करीत नसत. नित्य, नैमित्तिक पंगतीचे भोजन बनविण्यासाठी पेशवाईत मक्ते दिले जात.

पुण्यातील हिराबागेत निरनिराळ्या कारणास्ताव पेशवे अनेक मेजवान्या आयोजित करत. त्या मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राम्हण असल्याने त्यांचे सोवळेओवळे अत्यंत कडक म्हणून खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत. दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत असत.
सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खायचे पदार्थ कोठे व कसे वाढायचे याबद्दलची वाढ़पाची पद्धत नाना फडणीसांनी सुरु केली. पानात वरच्या बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या, कोशिंबिरी, लोणची, पापड, भजी, कुरडया व खीर पुरण असे. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या, आमट्या, सार, सांबार, व पक्वान्ने, पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार. ही वाढपाची पद्धत महाराष्ट्रात बरीच वर्षे टिकून आहे.

ब्राम्हण भोजनाच्या समयी दीड किंवा दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला १० ते १२ द्रोण, पानाभोवती रांगोळ्या, बसायला व टेकायला रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी (एक पक्वान् खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी), पानात १० भाज्या त्यात तोंडली, परवरे (पडवळ), वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, २ प्रकारची सांबारे, आमटी, १० प्रकारची लोणची (त्यातील एक साखरेचे गोड) असे. ३-४ प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, माध्यम गोड मठ्ठा, २ प्रकारच्या खिरी (शेवयाची व गवल्याची), सपिठाच्या पूर्ण पोळ्या (पुरण पोळ्या), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे, चिकवड्या, मिरगोंडे (मिरगुंडे), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, २० प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या, पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी, चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथी किंवा आंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरीत कोथिंबीर लसण, आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे याचा वापर करीत. तसेच आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड ( हे पक्वान्न शे बाजीराव ( दुसरे ) यांनी प्रचारात आणले. बासुंदी, केशरी साखरभात, जिलेबी ( हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले.) लाडू, पुरणपोळी ( हे पक्वान्न जास्त रूढ होते.) भोजनोत्तर ७ पानांचा प्रसिद्ध कुलपी विडा दिला जाई. ( पेशवाईत स्त्रियांनाही विडा खायची सवय होती.)
पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राम्हण भोजनाचा मक्ता ६९०० रु चा असे. त्यात २६ दिवस रोज ५०० ब्राम्हण भोजन करीत असत. यावरून दरपात्री साडे आठ आणे भोजनाचा खर्च पेशव्यांना येत असे. सन १८०७ मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज ५०० ब्राम्हण याप्रमाणे दिला होता. तसेच नेवैद्य व थोरले पंगतीसाठी १२५ भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा १००० पात्रे मिळून भोजनाचा २९ हजार रुपयांचा वेगळा मक्ता दिला होता. या मक्त्यात वार्षिक ३७ हजार पात्रे होत असल्याने पात्री १२ आणे प्रमाणे भोजनखर्च होत असे !
- सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल

हिवाळ्यात रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर येईल ग्लो
निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. यासाठी खर्च करुन ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण ...

Sarkari Naukri 2021:रेल्वेत थेट भरती, 10वी उत्तीर्ण बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या
सरकारी नोकरी 2021: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा बंपर भरती करण्यात येत आहे. या थेट भरतीमुळे ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या ...

Relationship Tips:लग्नानंतर प्रेम कमी होऊ लागले आहे, या टिप्स अवलंबवा
एखादी व्यक्ती इतकी प्रेमात पडते की त्याच्याशिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते ज्याची आपण ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती ...

मासिक पाळी दरम्यान करा हे 3 योगासने करा वेदनांपासून मुक्ती मिळेल
मासिक पाळीच्या काळात महिलांना ओटीपोटात दुखणे, पाय दुखणे, मूड बदलणे, सूज येणे, स्तन दुखणे ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या ...

Vitamin B12 च्या अभावामुळे होऊ शकतो स्मृतिभ्रंश, जाणून घ्या कोणत्या आजारांना धोका
जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल तर व्हिटॅमिन बी-12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. ...