गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (10:52 IST)

म्हशीची दुचाकीला धडक, पुण्यात दाम्पत्य जखमी

pune couple injured after buffalo attack
पुणे : येथे रस्त्यावर म्हैस धडकल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली आहे. म्हशीच्या मालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये घटना कैद झाली असून त्यात दिसत आहे की म्हैस अचानक उधळून तिने रस्त्यावरुन जाणाऱ्या दोन दुचाकींना थेट धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले आहेत. दुचाकी चालक जुबेर शेख हे पत्नीसोबत जात असताना वरशी मस्जिदजवळ ही घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे.
 
या प्रकरणात म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.