Marathi Biodata Maker
✕

पुणे मेट्रोमध्ये चक्क ढोल वादन

Updated: गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (13:19 IST)
 
हल्ली राज्यभरात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असून पुण्यातही ढोल पथकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र आता एका ढोल पथकाने थेट पुण्याच्या मेट्रोमध्येच वादन केलं आहे. सोशल मीडियावर या वादनाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 
 
पुण्याच्या दुर्गा ब्रिगेट संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे गणेशोत्सवानिमित्त तयारी करण्यासाठी मेट्रोमध्ये ढोल पथकाने वादन केलं. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे गणेशोत्सवानिमित्त सोमवारी संध्याकाळी ढोल ताशा पथकातर्फे वादन करण्यात आलं.
 
आता याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे मात्र वादनावरुन नेटकऱ्यांनी जोरदार टीकाही केली आहे. या वादनामुळे नागरीक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
 
पुणे मेट्रोत नागरीकांना वेगळेवेगळ्या प्रकारचे सोहळे साजरे करता येत  आहे. काही दिवसांपुर्वी याच मेट्रोत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमदेखील पार पडला होता. तसेच यात वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार आहे.
 
खरं तर पुणे मेट्रो रेल्वेने खाजगी उत्सवांसाठी एक डबा देण्याची घोषणा केली. यात ज्यांना कार्यक्रम साजरे करणार्‍यांसाठी डब्यात एक फेरी (येणे-येणे) दिली जाईल. हा उपक्रम खुला असेल. दोन्ही मार्गांवर - लाईन 1 (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ते फुगेवाडी) आणि लाईन 2 (गरवारे कॉलेज ते वनाज) सुरु असेल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवेचे नियोजन

पुणे अग्निशमन दल दिवाळी निमित्त सतर्क, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; फटाक्यांबाबत कडक मार्गदर्शक सूचना

पीव्ही सिंधूची शानदार कामगिरी, पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत दाखल

जरांगे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमागे कोण आहे? संजय राऊत राहुल गांधींच्या सांगण्यावरून काम करत आहे; भाजपचा गंभीर आरोप

२७ ऑक्टोबरपासून काउंटर ट्रेन तिकिटांवरही प्रवास विमा संरक्षण उपलब्ध होईल; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पुढील लेख
Show comments