गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (21:33 IST)

Pune :पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे-लोणावळा सर्व लोकल 22 ऑगस्ट पासून पुन्हा पूर्ववत

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून लोणावळा -पुणे लोकलच्या मर्यादित फेऱ्या सुरु होत्या. पुणे-लोणावळा मार्गावर आता कोरोनाकाळापासून बंद असलेल्या लोकल पुन्हा पूर्ववत सुरु करण्याच्या निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार, चार लोकल फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, “पुणे लोणावळा मार्गावर एकूण 14 लोकल फेऱ्या परत सुरु होण्याने हजारो रेल्वे प्रवाशांना त्याचा लाभ होईल. दुपारी व रात्री उशिरा लोकल फेऱ्या नसल्याने लोकांना त्रास होत होता. तो यामुळे कमी होईल.”