सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (21:13 IST)

दारूचा ग्लास सांडला म्हणून मारहाण करून एकाची हत्या

murder
पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी भागात दारूचा ग्लास सांडला म्हणून काठ्या आणि दारूच्या बाटलीने मारहाण करून एकाची हत्या करण्यात आली. या मारहाणीत बालाजी नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निलेश धुमाळ आणि राजेंद्र थोरात या दोघांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी कि, मृत बालाजी, आणि त्याचे दोघे साथीदार निलेश धुमाळ, राजेंद्र थोरात हे तिघे कंट्री बारच्या मागील बाजूस दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी निलेश आणि बालाजी दारू पिताना बालाजीकडून निलेशचा दारूचा ग्लास सांडला म्हणून निलेशने काठ्या आणि दारूच्या बाटलीने बालाजीला मारहाण करत गंभीर जखमी केले यात बालाजीचा मृत्यू झाला .याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींवर कारवाई केली आहे.
बालाजीची हत्या करून त्याचा मृतदेह हा कचरा गाडीतून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आला . मृत बालाजी हा नांदेडचा रहिवासी असून सध्या तो झाडू मारण्याचे काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलैला संध्याकाळी माण-महाळुंगे येथे रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात एक अनोळखी मृतदेह आढळला. त्याची ओळख पटलेली नव्हती. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात त्याच्या डोक्यावर वार करून खून केल्याचे उघड झाले आहे.
पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत . दरम्यान पोलिसांकडून परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. कचरा टाकणाऱ्या गाडीची ओळख पटवून याचा चालक राजेंद्र याला अटक केली. तर कंट्रीबार येथे काम करणारे अखिल आणि धर्मेंद्र या दोघांनी कचऱ्यासह बालाजीचा मृतदेह गाडीत भरला होता. त्यामुळे पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.