1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Uday Samant says I dont condone such a cowardly attack

उदय सामंत म्हणतात, अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही

शिंदे गटात गेलेले माजी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतांच्या यांच्या गाडीवर कात्रज चौकात हल्ला झाला.  यासंदर्भात सामंत  यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ते म्हणाले की, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात. मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही.अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
 
या हल्ल्यात गाडीतील जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोघे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर असतांना हा हल्ला झाला. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप केला जात आहे.
पुढील लेख
मुंबईच्या ‘बेस्ट बस' ने घेतले 'हे' दोन महत्वाचे निर्णय