रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (07:45 IST)

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला; शिवसैनिकांनी केल्याचा आरोप

uday samant
शिंदे गटात गेलेले माजी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतांच्या यांच्या गाडीवर कात्रज चौकात हल्ला झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोघे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर असतांना हा हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप केला जात आहे.
 
मुख्यमंत्री हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा हल्ला झाला. शिवसैनिकांनी उदय सामंतांच्या गाडीचा ताफा बघितला आणि त्यानंतर त्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यात गाडीची काच फोडल्याचे बोलले जात आहे.