मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (12:10 IST)

अमित शहांच्या प्रवासा दरम्यान काश्मीरमध्ये पुन्हा एका नागरिकाची हत्या, अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या

जम्मू -काश्मीरच्या शोपियांमध्ये एका नागरिकाची गोळ्या झाडल्याची बातमी आहे. ही घटना शोपियातील जैनापोरा भागातील बाबापोरा येथील आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्या व्यक्तीवर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असताना हा हल्ला झाला आहे. काल त्यांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जम्मू -काश्मीर पोलीस कर्मचारी परवेझ दार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.