शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (14:53 IST)

आश्चर्यजनक ! काय सांगता , 65 वर्षांपासून या आजी वाळू खात आहे अखेर काय कारण आहे

प्रत्येकाची खाण्या-पिण्याची आवड वेगळीच असते. ही सवय त्याच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट होते. एखाद्याची आवड घराच्या बांधकामात लागणारी वाळू खाण्याची असेल तर, वाचून आश्चर्य वाटले न ,होय ! हे खरं आहे. वाराणसी मध्ये राहणाऱ्या 80 वर्षाच्या कुसुमावती आजी गेल्या 65 वर्ष पासून वाळू खात आहे. आणि त्या जिवंत आहे.ठणठणीत आहे. डॉक्टर त्यांना बघून चक्रावले आहे. त्यांना वाळू खायला मिळाली नाही तर त्या अस्वस्थ होतात. आणि त्यांच्या पोटात वेदना होते. या सर्व त्रासापासून वाचण्यासाठी त्या आपल्या आहारात वाळूचे सेवन करतात. त्यांनी यासाठी वेळा पत्रक देखील बनविले आहे. त्या संपूर्ण दिवसात 1 किलो वाळू खातात. 
 
दररोज सकाळी आपण अनोश्यापोटी पाणी पितो या आजी वाळूचे सेवन करतात. नंतर मग  चहा घेतात. कुसुमावती आजी दररोज सकाळी 100 ग्राम वाळूचे सेवन करतात. नंतर चहा आणि न्याहारी घेतात. अशा प्रकारे दुपारच्या जेवण्याच्या पूर्वी आणि जेवल्यानंतर वाळूचे सेवन करतात. 
 
वाळू खाण्याची सवय कशी लागली 
वाळू खाण्याचे मुख्य कारण यांच्या पोटात होणारी वेदना आहे. यांच्या पोटात सतत वेदना व्हायची  ती दूर करण्यासाठी एका वैद्याने ह्यांना अर्ध्या ग्लास दुधासह दोन चमचे वाळू खाण्याचा सल्ला दिला होता. कालांतराने ही त्यांची सवय आणि आवड बनली ही आवड 2 चमचा पासून आता  1 किलो वर आली आहे. 
 
डॉक्टरांच्या मतानुसार, हा एक मनोवैज्ञानिक आजार आहे. जो सवय बनतो. या आज्जींना वाळू खाल्ल्यामुळे कोणता ही त्रास होत नाही. त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना कुठला ही आजार नाही. आजींना दोन मुलं आहे ,पण ते या पासून लांबच राहतात