गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (16:32 IST)

दोन ट्रकमध्ये कार दबली, आठ लोकांचा मृत्यू झाला, एक मुलगी जिवंत राहिली

बहादूरगडमध्ये एका भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की यूपीतील एक कुटुंब कारमध्ये परतत होते. ओव्हरटेक करताना कार दोन ट्रकच्या मध्ये आली. यात स्वार आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. एका मुलीला पोलिसांनी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे.
 
हरियाणाच्या बहादूरगडमधील बदली-गुरुग्राम रस्त्यावर पहाटे चार वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. फरुखनगरजवळ हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या मध्यभागी एक कार आली. कारमध्ये नऊ जण होते. त्यापैकी आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि एका मुलीचा जीव वाचला. मृतांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.
 
गोगा मेडीहून दर्शन करुन कुटुंब परतत होते
अपघातात ठार झालेले सर्वजण उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अनूप नंगला गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जाते. जे राजस्थानातील गोगा मेडीला भेट देऊन परतत होते. पोलिसांनी तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढले. मुलीची गंभीर स्थिती पाहता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी तिन्ही वाहने जप्त केली आहेत. अपघाताचा तपास सुरू आहे.