सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (11:50 IST)

खळबळजनक ! मध्यप्रदेशातील मंदसोर येथील घटना ;चेटकीण असल्याच्या संशयावरून पुतण्याने काकूचा निर्घृण खून केला

मध्य प्रदेशातील मंदसोर येथे अंधश्रद्धेमुळे एका महिलेचा बळी गेला. निवळ चेटकीण असल्याच्या संशयावरून एका 40 वर्षीय महिलेची  हत्या करून तिचा पुतणा पळून गेला. बालीबाई असे या मयत महिलेचे नाव आहे. तर आरोपी विष्णू हा खून करून पसार झाला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून पुतण्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 
 
शामगड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरण असे आहे की, एका कुटुंबात एका मुलीच्या आजारावरून तणाव होता. कुटुंबियांना संशय आला की काकू जादू टोणा करते आणि ती चेटकीण आहे. तिच्यामुळेच मुलगी सतत आजारी राहते. यामुळे घरात वाद झाला आणि विष्णूने(22) आपल्या काकूची  तलवारीने वार करून खून केला. 
 
महिलेचे पती रामनारायण यांचे निधन झाले आहे. त्या आपल्या मुलासह राहत होता. आरोपी विष्णूने बालीबाई वर तलवारीने वार करून मुलाला मारण्यासाठी गोविंद याचावर देखील धावत गेला. पण गावातील काही लोकांनी त्याला वाचवले. घटने नंतर आरोपी विष्णू ने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनास पाठविले आहे.गावकरी जमिनीच्या वादातून हे खून केल्याचे सांगत आहे.