1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Horrible, forced wife to take bath in public to boost business

भयंकर, व्यवसायामध्ये भरभराट व्हावी म्हणून पत्नीला चक्क सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावली

पुण्यात व्यवसायामध्ये भरभराट व्हावी तसंच घरात सुख शांती नांदावी यासाठी एका उद्योजकाने पत्नीची अघोरी पूजा करुन मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला चक्क सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावली. एक उद्योजक ऑटो प्रायव्हेटल लिमिटेडचा संचालक आहे. त्याचीही पत्नीदेखील या कंपनीमध्ये संचालक आहे. इतकंच नाही तर मुलगा व्हावा यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन उद्योजकाने आपल्या पत्नीला रायगड इथं नेलं, तिथे पुन्हा पूजा करुन तिला सर्वांसमक्ष आंघोळ करायला लावली. याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि मांत्रिक मौलाना बाबा जमादार यांच्याविरुद् गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
2013 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं, त्यानंर त्या उद्योजकाने सातत्याने शारीरिक आण मानसिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. तसंच माहेरच्यांनी दिलेल्या सोन्याचे, हिऱ्याचे आणि चांदीच्या दागिन्यांचा अपहार करण्यात आला.
 
महिलेच्या नावावर असलेल्या फ्लॅटची कागदपत्र गहाण ठेवून त्यावर 75 लाख रुपयांच कर्जही घेण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. वेळोवेळी मारहाण करुन व्यवसायासाठी आतापर्यंत 1 ते 2 कोटी रुपये घेतल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
पुढील लेख
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ITMS प्रणाली बसवली जाणार