शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑगस्ट 2022 (15:17 IST)

Pune accident: कंटेनरची दुचाकीला धडक, दोन शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

पुण्यात लोणी काळभोर येथे सकाळी झालेल्या अपघातात दोन शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्हीमुळे आपल्या मामा सोबत दुचाकीने शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एका कंटेनरने लोणी स्टेशन चौकात यांचा दुचाकीला धडक दिली. या मध्ये दोघींचा जागीच मृत्यू झाला. छकुली कुमार शितोळे (17) आणि राजश्री कुमार शितोळे(10) अशी मयत मुलींची नावे आहेत. मयत छकुली ही इयत्ता 11 वीत तर राजश्री ही इयत्ता 6वींत  पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये त्या शिक्षण घेत होत्या. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात एका कंटेनर ने दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.