सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (15:01 IST)

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

मुसळधार पावसाचा फटका मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील खंडाळा आणि लोणावळ्या स्थानकादरम्यान दरड कोसळली आहे. त्यामळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
 
गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खंडाळा आणि लोणावळ्या स्थानकामधील असलेल्या मंकी हिल ते ठाकूरवाडीदरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळते. दरड कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तसेच, दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.
 
अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. सध्या रेल्वे उशिराने धावत आहे. शिवाय, लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
file photo