शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 21 ऑगस्ट 2022 (10:58 IST)

Accident : ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळूनअपघातात तिघांचा मृत्यू

accident
पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या कारला ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कार रायगड जिल्ह्यातील माणगांव जवळील कोंडेश्वर गावाच्या हद्दीतून जाताना दरीत कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले असता त्यांची कार माणगाव जवळील कोंडेश्वर गावाच्या हद्दीतून जाताना अपघातग्रस्त होऊन 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. 

 या अपघातात मृत्युमुखी झालेले तिघे वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड असे मयताचे नावे आहेत, तर रोशन गाडे,रोशन चव्हाण आणि प्रवीण सरकटे हे जखमी झाले आहे. त्यांच्या वर माणगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.