मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (22:48 IST)

पुणे जिल्ह्यातील 12 लाख 20 हजार ग्राहकांचे वीज बिल थकीत

पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर थकबाकीदार ग्राहकांच्या तुलनेत सर्वाधिक 27 लाख 44 हजार घरगुती ग्राहकांकडे 863 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 12 लाख 20 हजार 350 (39.46 टक्के) ग्राहकांकडे 439 कोटी 67 लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.
 
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 31 लाख 37 हजार 389 ग्राहकांकडे 1290 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सर्वाधिक 87.46 टक्के थकबाकीदार ग्राहक हे घरगुती वीजवापर करणारे आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी तसेच ऑनलाईन शिक्षण व कार्यालयीन कामांसह इतर घरगुती कामांसाठी विजेची नितांत आवश्यकता आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या एकूण घरगुती 58 लाख 28 हजारांपैकी तब्बल 27 लाख 44 हजार (47 टक्के) घरगुती ग्राहकांनी वीजबिल थकविलेले आहे.
 
सद्यस्थितीत जिल्हानिहाय एकूण घरगुती ग्राहकांच्या तुलनेत पुणे जिल्हा- 12 लाख 20 हजार 350 (39.46 टक्के) ग्राहकांकडे 439 कोटी 67 लाख, सातारा- 3 लाख 39 हजार 355 (51.57 टक्के) ग्राहकांकडे 55 कोटी 33 लाख, सोलापूर- 4 लाख 480 (65.38 टक्के) ग्राहकांकडे 140 कोटी 98 लाख, सांगली- 3 लाख 19 हजार 143 (54.18 टक्के) ग्राहकांकडे 91 कोटी आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 लाख 64 हजार 701 (53 टक्के) घरगुती ग्राहकांकडे 136 कोटी 48 लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे.
 
महावितरणकडून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून थकबाकी वसुल करण्याची धडक मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई सुरु आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. 3) व रविवारी (दि. 4) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.