बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified गुरूवार, 24 डिसेंबर 2020 (09:10 IST)

एल्गार परिषदेला स्वारगेट पोलिसांकडून परवानगी नाकारली

येत्या 31 डिसेंबरला पुण्यात होऊ घातलेल्या एल्गार परिषदेला स्वारगेट पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती आणि रात्रीच्या संचारबंदीचे (नाईट कर्फ्यू) कारण देत पुणे पोलिसांकडून या परिषदेला परवानगी नाकारल्याचे समजत आहे.
 
बी. जी. कोळसे-पाटील यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून गणेश कला क्रीडा मंडळामध्ये एल्गार परिषद घेऊ, असे म्हटले होते. त्यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात त्यांनी अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीत एल्गार परिषदेला परवानगी देता येणार नाही, असे सांगत हा अर्ज फेटाळून लावला आहे.