शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (19:30 IST)

तुळशीबागेत अतिक्रमणची कारवाई

atikraman
तुळशीबागेतील सुमारे अडीचशे स्टॉलवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. एप्रिल 2018 पासून येथील फेरीवाल्यांनी परवाना शुल्क भरले नसून व्यापाऱ्यांकडे सुमारे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने व्यापाऱ्यांचे स्टॉल बंद राहिले. त्यामुळे 221 व्यावसायिकांपैकी अंजाजे 95 जणांकडून परवााना शुल्क थकबाकी वसूल करण्यात आली आहे. यापुढेही दैनंदिन कारवाई केली जाणार आहे. डीपी रस्त्यावरील कारवाईनंतर अतिक्रमण विभागाची कारवाई संथ झाल्याने दिसत होते. दहा बारा दिवसांनी करावाईला पुन्हा वेग आल्याचे दिसत आहे. रस्ता आणि पदपथांवर अधिकृतपणे व्यवसाय करणार्‍या पथारी  व्यावसायिकांवर तसेच पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागातर्फे दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी शर्तींचा भंग करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. याबाबत अतिक्रमण विभागाने पूर्वसूचना दिली होती. स्टॉल्सचे नुकसान झाले नाही. अनेक व्यवसायिकांनी लगेचच थकबाकी शुल्क भरले. इतर व्यावसायिक पुढील तीन चार दिवसांमध्ये शुल्क भरणा करणार आहेत. असे विनायक कदम, उपाध्यक्ष, छोटे व्यावसायिक असोसिएशन यांनी सांगितले.