शनिवार, 5 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 11 सप्टेंबर 2022 (13:42 IST)

राज्यात लम्पी आजाराचा शिरकाव, मावळात 20 जनावरांना लागण

राज्यात आता लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला असून मावळातील उर्से गावात 20 जनावरांना या रोगाची लागण लागली असून तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. बाह्य कीटक ने या रोगाचा प्रसार होतो. या आजारामुळे जनावरांना ताप येऊन त्यांच्यातील दूध देण्याची क्षमता कमी होते. शासनाच्या नियमानुसार, जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरु होऊन या क्षेत्रातील पाच ते दहा किलोमीटर पर्यंत लसीकरण सुरु केले आहे. या आजारामुळे जनावरे चारा खात नाही आणि ते मरण पावतात. या साठी त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे.

नवलाख उंब्रे, जाधववाडी, मेंढेवडी, या गावात लक्ष जास्त दिले आहे. आतापर्यंत चार हजार आठशे त्रेंशी जनावरांच्या लसीकरणाचे काम पूर्ण केले आहे. लम्पि स्किन विषाणू या रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसते. त्यामुळे रोगी जनावरे अधिक अशक्त होतात.

सध्या मावळात सुमारे 52 हजार पशु आहेत. मावळच्या उर्से येथे या चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे. जनावरांमधील लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचे नियंत्रण करण्यासाठी अधिक प्रतिबंधनात्मक उपाययोजना करण्याचा दृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण आणि संसर्गचे प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार, प्राप्त अधिकारांचा वापर करत राज्य शासनाने या रोगांबाबतीत संपूर्ण राज्य 'नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. जनावरांमध्ये या रोगाचे लक्षण आढळ्यास घाबरून न जाता त्यांना तातडीने औषधोपचार करावे .