मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (08:09 IST)

‘लोन ॲप’ डाउनलोड करवून खंडणी उकळण्याचा प्रकार, बंगळुरू येथील ९ जणांना अटक करण्यात

arrest
पुणे- ‘लोन ॲप’ डाउनलोड करायला सांगितले. मात्र तिने मागणी केली नसतानाही कर्ज मंजूर करत त्याचे पैसे व्याजासहित परत करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन १ लाख ११ हजार रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंगळुरू येथील ९ जणांना अटक करण्यात आली. ‘लोन ॲप’ फसवणूक प्रकरणात पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली आहे.
 
विघ्नेश मंजुनाथ, गणेश सुब्बारायडू, आकाश एम. व्ही., श्रद्धा सुधाकर गौडा, पार्वती संतोष दास, अश्विनी डी मुरुगन, शिल्पा सुभाष गौडा, प्रिया एस., दीपिका एल. (सर्व रा. बंगळुरू) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात खंडणी, फसवणूक, अब्रुनुकसानी, धमकावणे आदी विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत तीस वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ फेब्रुवारी ते १० जून या कालावधीत ऑनलाइन स्वरुपात घडला.  या प्रकरणाचा तपास करून सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून नऊ आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले. आरोपींनी या महिलेच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, छायाचित्रे व माहिती चोरली. त्यानंतर ही छायाचित्रे मॉर्फ करत त्यावर बदनामीकारक संदेश लिहून संपर्क यादीतील लोकांना पाठवित महिलेला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार उघड झाला आहे. न्यायालयाने या नऊ जणांना सात ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.