शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (23:28 IST)

फडणवीस आता लवकरच दुसरा बॉम्ब टाकणार, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Fadnavis will soon drop another bomb
देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या पहिल्याच बॉम्ब टाकल्यावर सर्व चिडीचूप झाले. आता फडणवीस लवकरच दुसरा बॉम्ब टाकणार आहे असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमांनंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.  

आम्ही सरकार पाडणार फडणवीस असं म्हणाले नाही. फडणवीस असं म्हणाले की अब बारी मुंबई की है ! लढाई  शिवसेनेच्या विरोधात नाही  तर लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. ती आम्ही जिंकणार. निवडणुका पुढे ढकलून सरकारने आजच मरण उद्यावर ढकलले आहे. मुंबई महापालिकेत यंदा भाजपचेच सत्ता येणार असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.  
 
चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणेचा वापर करून पेन ड्राइव्ह सादर केल्या असं बोलल्यावर त्यावर प्रत्युत्तर देताना म्हणाले की , जरी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय यंत्रणाचा वापर केला पण त्यांनी सत्य समोर आणले.